संजीवनी ज्यु. कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
वैजापूर, (प्रतिनिधी): विज्ञान प्रदर्शनाचे उद्धिष्ट केवळ मॉडेल्स सादर करणे नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे हा होय. अशा प्रदर्शनातून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळते. यातुन त्यांची प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि संजीवनी संस्थेने आजवर अनेक वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञान तज्ञ, आणि संशोधक घडवण्याची परंपरा जपली आहे. अशा उपक्रमांमधुन हे शक्य झाले. याच अअनुषंगाने वैजापुर आणि पंत्रक्रोशितील बाल वैज्ञानिकांना व्यासपीठ मिळावे, म्हणुन आग्रह पूर्वक हे विज्ञान प्रदर्शन संजीवनी ज्युनिअर कॉलेज मध्ये होत आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित वैजापूर येथिल संजीवनी ज्युनिअर कॉलेजमध्ये वैजापूर पंचायत समिती शिक्षण विभाग पुरस्कृत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सुमित कोल्हे बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर, विस्तार अधिकारी अनिल पुदाट, संजीवनी अकॅडमीच्या संचालिका निकिता कोल्हे, प्राचार्य विनोद शेटे, पंचायत समितीचे बागुल, आदी उपस्थित होते. यावेळी सुमित कोल्हे म्हणाले की, संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांची ग्रामिण भागातील विद्याथ्यर्थ्यांनी पुढे येवुन उत्कर्ष साधावा अशी तळमळ असते.
त्यादृष्टीने संजीवनी मार्फत व्यासपीठ उपलब्ध करण्यात नेहमीच पुढाकार असतो. विज्ञान प्रदर्शनातील स्पर्धा इ. ६ वी ते ८ वी, इ. ९ वी ते इ.१२ वी, दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक अशा चार गटांमधुन घेण्यात आल्या. या प्रदर्शनात ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन, ऊर्जा निर्मिती, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान अशा विविध विषयांवर १५४ नाविण्यपूर्ण मॉडेल्स सादर केली.